मजूराची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण परिसरातील मंगलपुरी नगरातून तरुणाची दुचाकी लांबवल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारा उघडकीला आले आहे. याप्रकरणी  शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अतुल गणेश वखरे (वय-२७) रा.मंगलपुरी नगर, साईप्रसाद कॉलनी, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो.  १९ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान त्याच्या घरासमोर लावलेली दुचाकी (एमएच १९ डी ७१७९) ही पार्क  करून लावलेली आहे.  दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अतुल वखरे यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार आज्ञाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

Protected Content