जळगावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आशा बाबानगर परिसरातून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलाला काहीतरी आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात शनिवारी २५ नोव्हेंबरची रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, प्रणव नितीन राणे वय-१२, रा. श्याम नगर, जळगाव हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रणव राणे ह मुलगा घरी असतांना याला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत त्याला फूस लावून पळवून नेले हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याची कुठेही माहिती मिळाली नाही, अखेर रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.  त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.

Protected Content