चिंताजनक : इराणमध्ये तब्बल २५५ भारतीयांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एकट्या इराणमध्ये तब्बल २५५ भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर १२ जण यूएईमध्ये आढळले आहेत. यामुळे परदेशातील कोरना बाधित रुग्णांची संख्या आता २७६ वर पोहचली असल्याची माहिती नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने लोकसभेत देण्यात आली.

 

इराणमधील कोम शहरात तपासनी केल्यानंतर तब्बल २५४ भारतीयांना कोरोनोची लागण झाल्याचे आढळून आल्याचे वृत्त होते. मात्र, आता खुद्द परराष्ट्र मंत्रालयानेच लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार हा आकडा २५५ असल्याचे निश्चित झाले आहे. चीननंतर कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली आणि इराणला बसला आहे.

Protected Content