गाळेधारकांचे तीन महिन्यांचे भाडे माफ करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांमधील दुकानदारांचे तीन महिन्यांचे भाडे माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या विळख्यात संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्य सापडले असुन या घातक अशा आजाराचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने मागील तिन महीन्यांपासुन लॉक डाऊन केले असुन यामुळे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलनातील विविध व्यवसायीकांनी भाडेतत्वावर गाळे घेतली आहेत. यात सतत तिन महीन्यांपासुन या गाळेधारक व्यवसायीकांची दुकानेही पुर्णपणे बंद असल्या कारणाने या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलनातील गाळेधारक दुकानदार व्यवसायीक मोठया आर्थीक अडचणीत आले आहेत. या सर्व गाळेधारक व्यापार्‍यांचे तिन महीत्यांचे संपुर्ण भाडे माफ करावे अशा मागणीचे लिखित निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना देण्यात आले आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड. देवकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील, फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, हेमंत येवले, अय्युब खान , गनी शेख , मनोहर महाजन, सईद शेख रशीद आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Protected Content