खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत रोहित पाटील विजेता

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त कांताई सभागृहात झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत फिडे मानांकित खेळाडू रोहित पाटील (१५९९) याने प्रथम तर फिडे मानांकित खेळाडू गुणवंत कासार (१३५६) याने द्वितीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेत १५ फिडे मानांकित खेळाडूंसह एकूण ७८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामध्ये नऊ फेर्‍या अखेर रोहित पाटील याने आठ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला तर गुणवंत कासार याने साडेसात गुणासह द्वितीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना बक्षीस वितरण महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार व जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून फीडे मानांकित खेळाडू भाग्यश्री पाटील, जि. प. उप कार्यकारी अधिकारी रफिक तडवी, संघटनेच्या सौ. रेखा पाटील,जैन स्पोर्ट्स चे अरविंद देशपांडे हजर होते.

स्पर्धेचा खुल्या गटाचा निकाल पुढीलप्रमाणे लागला.

१) रोहित पाटील (८)
२) गुणवंत कासार(७.५)
३) वैभव बडगुजर (७)
४) भारत आमले (७)
५) दयानंद शेंडे (६.५)
६) अक्षय सावदेकर (६.५)
७) विवेक बडगुजर (६.५)
८) प्रा. सोमदत्त तिवारी (६.५)
९) आयुष गुजराती (६)
१०) प्रगल्भ चौधरी (६)

सात वर्ष वयोगट

१) तसीन तडवी (५)
२) आरुष सरोदे (३)
३) भार्गव लवनगळे (१)

दहा वर्षे वयोगट

१) माही संघवी (६)
२) जयेश सपकाळे (५)
३) शेरॉन ठाकूर (५)
४) ईशान कोळी (४.५)
५) अंकित दुग्गड (४.५)

तेरा वर्ष वयोगट

१) विनय सोनवणे (६)
२) उज्वल आमले (५.५)
३) शिवम मुंदडा (५)
४) सानिका महाजन (५)
५) मयूर बडगुजर (४.५)

मुलींचा गट

१) सानिया तडवी (६)
२) गुर्मीत बोपाराय (५.५)
३) धरती कुंटे (५)

धक्कादायक निकाल

फिडे मानांकित खेळाडू आयुष गुजराती (१०६५) त्याने फिडे मानांकित खेळाडू प्रा. सोमदत्त तिवारी यांचा चौथ्या फेरीत पराभव केला तर तर फिडे मानांकित खेळाडू सानिया तडवी (१२११) हिने फिडे मानांकित खेळाडू रोहित पाटील (१५९९) याचा पराभव केला. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांनी काम पाहिले.

Add Comment

Protected Content