जळगावात तीन दिवसीय कला महोत्सवाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । जळगावात १ ते ३ फेब्रुवारीच्या दरम्यानतीन दिवसीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कला व संस्कृती विभाग-गोवा शासन आणि *स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित, कै. नथ्थूशेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित, आणि भवरलाल व कांताबाई फाउंडेशन* च्या सहकार्याने तीन दिवसीय कला महोत्सवाचे आयोजन दि.१,२,३ फेब्रुवारी २०१९ दरम्यान करण्यात आलेले आहे. तिन्ही दिवस कार्यक्रम संध्याकाळी ७ ते १० या वेळात होणार आहेत. यापैकी पहिल्या दोन दिवसांचे कार्यक्रम अर्थात दि. १ व २ ही दोन नाटके भैय्यासाहेब गंधे सभागृहात होतील. समारोपाचा सतार वादनाचा आणि नाट्यसंगीत रजनीच्या कार्यक्रम कांताई सभागृहात होईल. या कला महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, अशोकभाऊ जैन, मेजर वाणी व जेष्ठ नाटककार सुशील अत्रे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या दरम्यान गोवा सरकारचे सांस्कृतिक समन्वयक गोविंद शिरोडकर व सचिव भालचंद्र उसगावकर यांचीही उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम अंतर्गत हा महोत्सव संपन्न होत आहे. हे सर्व कार्यक्रम तमाम जळगावकर रसिकांसाठी असून प्रवेश विनामूल्य आहे. रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content