दलीत, आदिवासी व मुस्लीमांना भारतरत्न का नाही ? ओवेसींचा सवाल

कल्याण प्रतिनिधी । भारतरत्न पुरस्कारांच्या वादात आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेत दलीत, आदिवासी व मुस्लीमांना भारतरत्न का मिळत नसल्याचा सवाल सरकारला विचारला आहे.

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. याशिवाय, संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख व गायक भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचे घोषीत केले. यावरून भाजप हा विशिष्ट विचारधारेलाच प्राधान्य देत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. एममआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कल्याण येथील वंचितांच्या सभेत बोलतांना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भारतरत्न पुरस्कार हा जात बघून देण्यात येत आहे. दलीत, आदिवासी व मुस्लीमांना हा पुरस्कार का मिळत नाही असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Add Comment

Protected Content