पुन्हा एक मान्यवर हिंदू धर्मात करणार प्रवेश !

तिरूअनंतपुरम वृत्तसंस्था | वासीम रिझवी यांच्या पाठोपाठ आता विख्यात मल्याळी दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम सोडून हिंदू धर्मात प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे.

लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर कट्टरतावाद्यांनी टाकलेल्या स्मायलीमुळे संतप्त होऊन ख्यातनाम मल्याळी दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लामचा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. बिपिन रावत यांच्या निधनानंतर काही इस्लामवाद्यांकडून आनंद साजरा करण्यात आला. याच्या निषेधार्थ अली अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला. जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात निधनाच्या पोस्ट आणि कमेंटच्या खाली अनेक इस्लामवाद्यांनी स्मायली इमोजी वापरल्याचे पाहूने ते उद्वीग्न झाले. यावरून त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.

अली अकबर यांनी केलेल्या फेसबुक लाइव्हवर काही लोकांनी सीडीएस रावत यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. यातील आक्षेपार्ह कॉमेंटमुळे त्यांचे फेसबुक खाते ब्लॉक झाले. लोकांच्या या वृत्तीने अली अकबर यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानंतर अली अकबर यांनी दुसरे खाते उघडून त्यावर इस्लाम सोडत असल्याचे जाहीर केले. अकबर पुढे म्हणाले की, मोठ्या इस्लामिक नेत्यांनीही शूर लष्करी अधिकार्‍यांचा अपमान करणार्‍या ङ्गदेशद्रोहीफ अशा कृतींना विरोध केला नाही आणि हे आपण स्वीकारू शकत नाही. आपला धर्मावरील विश्वास उडाला आहे. त्यांनी फेसबुकवर यासंबंधित व्हिडिओ पोस्ट केला आहे. आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे. भारताविरुद्ध हजारो हसतमुख इमोजी पोस्ट करणार्‍या लोकांना हेच माझे उत्तर आहे. आपण स्वत: पत्नीसह हिंदू धर्म स्वीकारत असल्याचेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या संदर्भात एका वृत्तपत्राला मुलाखतीत अकबर म्हणाले की, मफसोशल मीडियावर अनेक देशविरोधी कारवाया होतात आणि रावत यांच्या मृत्यूवर हसणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. हसत इमोटिकॉनसह कमेंट करणारे आणि रावत यांच्या मृत्यूची बातमी साजरी करणारे बहुसंख्य वापरकर्ते मुस्लिम होते. त्यांनी हे केले कारण रावत यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि अतिरेक्यांविरुद्ध अनेक कारवाया केल्या होत्या. एका धाडसी अधिकार्‍याचा आणि देशाचा अपमान करणार्‍या या सार्वजनिक पोस्ट्स पाहिल्या तरी, एकाही मोठ्या मुस्लिम नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. मी अशा धर्माचा भाग होऊ शकत नाही.

Protected Content