क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त रिंगरोड येथील महाराणा प्रताप चौकात पुतळ्याचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.

मेवाड नरेश क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शहरातील महाराणा चौकात त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातील मान्यवरांहस्ते पुतळ्याचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, नगसेविका अॅॅड. शुचिता हाडा,  जी.एन. बापू पाटील, उदय पाटील, निलेशसिंह राजपूत, अतुलसिंह हाडा, निलेश चौघुले यांच्यासह मान्यवर आणि समाजबांधवांची उपस्थिती होती.

जळगाव शहरात पहिल्यांदा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, राजपूत समाज मित्र मंडळाच्या वतीने शांतीदूत मर्दानी आखाडा, कोल्हापूर यांच्या शिवकालीन युध्दकलेचे प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवकालीन युध्दशैलीची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार असून आमदार राजूमामा भोळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते याचे उदघाटन केले. त्यानंतर रक्तदान शिबीराचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वितेसाठी नितीन पाटील, करनी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्रसिंग पाटील, करनी सेनेचे उपाध्यक्ष निलेशसिंह राजपूत, गोपाल पाटील, शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिपक दाभाडे यांच्या आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/568200224818371

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1034486794110848

भाग ३
https://www.facebook.com/watch/live/?ref=watch_permalink&v=1039642730001222

भाग ४
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/671285950637451

Protected Content