नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेले राजकारणातील गढूळ वातावरण पाहता आपला राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांनी केले.
नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेल्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात आज संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी ड. उज्ज्वल निकम यांची प्रकट मुलाखत घेतली. यात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यात अलीकडच्या काळात राजकीय वातावरण गढूळ झाल्याचे नमूद केले. मला अडीच वर्षांपूर्वीच खासदारकीची ऑफर आली होती. तथापि, आपण ही ऑफर स्वीकारली नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान, उज्वल निकम यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टातील काही न्यायमूर्ती हे निवृत्त होणार असल्याने या खटल्याचा निकाल हा तात्काळ लागण्याची शक्यता आहे. तर आपण डॉक्टरकीसाठी प्रयत्न करत होतो. दोन मार्कांनी प्रवेश हुकला आणि आपण विधी शाखेकडे गेलो अशी माहिती देखील त्यांनी दिली.