सुनील झंवरकडे आढळले गिरीश महाजन व वॉटर ग्रेसशी संबंधीत कागदपत्रे

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यातील सूत्रधार सुनील झंवर याच्या घरून माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह महापालिकेतील वॉटरग्रेस कंपनीशी संबंधीत कागदपत्रे आढळून आल्याने आता महाजन झंवर यांच्यातील संबंधाच्या दिशेने तपास सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

प्रतिनिधी । जळगावबीएचआर घोटाळ्यात सोसायटीच्या कार्यालयातील कपाटांमधून माजी मंत्री आमदार गिरीश महाजनांशी संबंधित कागदपत्रेदेखील मिळाली. वॉटरग्रेस ही जळगाव महापालिकेने सफाईचा ठेका दिलेली कंपनी आहे. या कंपनीशी संबंधित कागदपत्रेही तिथे सापडल्याची माहिती समोर आली आहे.

वास्तविक पाहता सुनील झंवर हे राजकीय पक्षाशी संबंधीत नसतांनाही त्यांच्याकडे याबाबतची कागदपत्रे आढळून आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

महाजन नाशिकचे पालकमंत्री असताना तेथे झालेल्या कुंभमेळ्यातील अनेक कामांचे मक्ते झंवर यांनी घेतले होते. त्या शिवाय नाशिक येथील बोरा (पूर्ण नाव माहित नाही) हेदेखील महाजन व झंवर यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जातात. झंवर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी नाहीत. वॉटरग्रेसच्या मक्त्यात त्यांचा कोणत्याही प्रकारचा कायदेशीर सहभाग नाही. असे असतानाही त्यांच्या कार्यालयातून वॉटरग्रेस व महाजन यांच्याशी संबंधित कागदपत्र मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Protected Content