भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कोळगाव येथील पाटील महाविद्यालयात सुरू असलेल्या बारावीच्या पेपरला कॉपी पुरवत असल्याचा प्रकार उघडकी आल्याने भडगाव पोलीस ठाण्यात केंद्र संचालकांसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. मंजुषा सुधाकर क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की. बारावीची परीक्षा मंगळवारपासुन सुरू झाली व इंग्रजी या विषयाचा पेपर होता. पथकाने सकाळी ११.३० वाजता भेट दिली असता खिडक्यांमधून विद्यार्थांना कॉप्या पुरविताना दिसून आले. तसेच काही लोक बाहेर पडताना दिसले यासशंयास्पद हालचालीवरून आम्ही त्यांना खोली उघडण्यास सांगितले. असता सुरुवातीस खोली उघडण्यास टाळाटाळ केली परंतु नंतर खोली उघडली असता खोली ही कस्टडी रुम आहे आणि त्यामध्ये परीक्षेचे गोपनीय साहित्य ठेवले होते. त्या मध्ये आम्हाला टेबलावर परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत असलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहलेल्या कागदांची प्रत दिसून आली या शिवाय या खोलीमध्ये मोबाईल व त्याची तपासणी केली असता त्या मधील वॉट्स अप मध्ये परीक्षांची उत्तरे लिहलेले कागदाचा फोटो कॉपी काढलेली दिसून आली. सदर मोबाईल हा त्या शाळेतील कर्मचारी अरविंद देसले यांचा होता. व सदर फोटो कोणी पाठवला विचारले असता भरत तुकाराम पाटील यांनी पाठवला असे सांगितले. म्हणून केंद्र संचालक राजेंद्र संभाजी पाटील, कर्मचारी अरविंद जगन्नाथ सावंत व शिपाई भरत तुकाराम पाटील यांच्यावर भडगाव पोलिस स्टेशनला महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व वितर विनाधिस्त परीक्षा मध्ये होणाऱ्या गैर प्रकारास प्रतिबंध करणे बाबत अधिनियम १९८२ चा कायदा कलम ५ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ. पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.
सदर संस्थेच्या तालुक्यात इतर महाविद्यालयात १२वी बोर्ड परीक्षा सुरू असून या आरोपींनी तालुक्यात सदर प्रश्न पत्रिका व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवली असल्याचे संशय निर्माण होत आहे. तरी या १०वी व १२वी परीक्षेत कॉपी हा प्रकार बंद होईल की नाही? असा प्रश्न पालकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.