Home क्राईम कॉम्पलेक्सच्या पार्कींगमधून दुचाकी लंपास

कॉम्पलेक्सच्या पार्कींगमधून दुचाकी लंपास

0
102

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कॉम्पलेक्सच्या तळमजल्यावरील पार्कींगमधून दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

शहरातील सिंधी कॉलनीतील कंवरनगरातील हरिष रामदास वालेचा (वय-३५) हा तरुण त्याच्या (एमएच १९ डीएफ ८९९८) या क्रमांकाच्या दुचाकीने आला होता. त्यानेआपली दुचाकी कॉम्पलेक्समधील तळ मजल्यावरील पार्कींगमध्ये लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी लांबविली. त्यांनी संपुर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला मात्र तरी देखील मिळून न आल्याने त्यांना दुचाकी चोरीची खात्री झाली. वालेचा यांनी बुधवारी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास योगेश बोरसे हे करीत आहे.


Protected Content

Play sound