पुण्यात कोरोना व्हायरसवर लस विकसित

korena

 

पुणे (वृत्तसंस्था) जीवघेण्या कोरोना व्हायरसवर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने, अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने लस विकसित करण्यात आली आहे. दरम्यान, या लसीच्या मानवी चाचणीनंतर तिला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतर तिचा प्रत्यक्ष वापराला सुरुवात केली जाऊ शकते.

 

या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखता येऊ शकेल. ही भारतातील पहिली लस असेल, जी इतक्या वेगाने या स्तरापर्यंत आणण्यात यश मिळाले आहे, असे सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार आहे, असा दावा संस्थेने केला आहे.

Protected Content