भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटला ; एकाचा मृत्यू

blast

अहमदनगर (वृत्तसंस्था) तालुक्यातील खारेकर्जुने येथे लष्कराच्या हद्दीत भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटल्याने एकाच मृत्यू झाला आहे.

 

के.के. रेंज हद्दीत लष्कराचा दारूगोळा उडविण्याचा सराव केला जातो. सराव संपल्यानंतर परिसरातील काही भंगार गोळा करण्यासाठी लष्करी हद्दीत जातात. मात्र आज एक बॉम्ब जिवंत असल्याने त्याचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. भिवा साधू गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, के के रेंज परिसर हा लष्कराचा संवेदनशील भाग असूनही यापूर्वी जुलै 2019 मध्येही असाच स्फोट होऊन खारेकर्जुने याच गावातील दोघांना आपला जीव गमवावा लागला होता.

Protected Content