बालसप्ताहनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | बालदिन सप्ताहानिमित्त केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन १०९८  तर्फे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

१४ ते २१ नोव्हेंबर बालदिन सप्ताह देशभरात पाळला जात असून स्वयसिद्धा- सेल्फ डिफेन्स, रांगोळी स्पर्धा, इंडस्ट्रियल व्हिजिट, चित्रकला स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चित्रकला स्पर्धा तीन गटांसाठी ५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी , ११ वी व १२ वी या वर्गांसाठी आयोजित केले आहे. स्पर्धेसाठी बालविवाह, बालमजुरी, घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, व्यसनाधीनता या विषयांवर चित्र अपेक्षित आहेत. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच प्रत्येक स्पर्धकास सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल. चित्र स्विकारण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून केशवस्मृती प्रतिष्ठान २७३ नवी पेठ जळगाव, येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी ९९ २१४ ७२ ७६६ , ७७२१८ ९३३९१ या फोन नंबर वर संपर्क करावा. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संचालक रत्नाकर पाटील यांनी केले आहे.

Protected Content