कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना ५० हजाराची मदत

यावल, प्रतिनिधी | कोरोना संसर्गाच्या काळात दुदैवी मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबास शासनाची आर्थिक मदत मिळण्यासाठी मोफत ऑनलाइन अर्ज भरणे व मार्गदर्शन नगरसेवक तथा आई हॉस्पीटलचे संचालक डॉ. कुंदन फेगडे यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

 

संपुर्ण देशात व राज्यात मागील दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या काळात लाखो नागरीकांचा दुदैवी असा मृत्यू झाला आहे. या काळात मरण पावलेल्या कुटुंबातील कमाविता व्याक्ती अचानक निघुन गेल्याने अनेकांवर आर्थिक संकटाचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या काळात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाच्या काळातून सदरच्या मयत व्याक्तीच्या कुटुंबास सावरण्यासाठी शासनाच्या वतीने पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रीयेसाठी कोरोना काळात कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तिच्या लाभासाठी पात्र कुटुंबास ऑनलाईन कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या वतीने लाभार्थी कुंटुबास मोफत मार्गदर्शन आणि ऑनलाईन अर्ज भरण्याचे विधायक कार्य सामाजिक कर्तव्य म्हणुन केले जात आहे. कोविडच्या लाटेत ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला अशा नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना आर्थिक सहाय्य म्हणून शासनाने ५०,०००/-रु (पन्नास हजार रुपये ) मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता नागरिकांचे ऑनलाईन अर्ज भरले. त्यांना आई हॉस्पिटल यावल येथे टोकन देण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या संकटात सापडलेल्या कुटुंबांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content