हाथरस घटनेतील आरोपींना कठोर कारवाई करा; चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीची मागणी (व्हिडीओ)

चाळीसगाव दिलीप घोरपडे । उत्तर प्रदेश येथील हाथरस घटनेतील आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन चाळीसगाव महिला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तरप्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील दलित परिवारातील 19 वर्षीय मुलीवर काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर तिचे हाडेही तोडली गेली. ती ह्यात नसली तरी मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्वकाही कथन केले आहे त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गाव गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटकही केली. असल्या गाव गुंड प्रवृत्तीच्या नराधमांना कायद्याने फास्टट्रॅक न्यायालयात दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी असे निवेदन चाळीसगाव महिला शिवसेनेच्या आघाडीच्या वतीने देण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाने, तालुका संघटक सुनील गायकवाड, जगदीश महाजन, संजय ठाकरे, शैलेंद्र सातपुते, अनिल राठोड, दिलीप पाटील, रामेश्वर चौधरी, सागर पाटील, बापू लेनेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सविता कुमावत, शुभांगी कुमावत, स्मिता सोनवणे, ज्योती गवळी, निर्मला मोरे, मनीषा महाजन, सोनाबाई कोळी, रंजना पाटील, मनीषा कोळी, नकुल बाई पाटील, मंगलबाई सूर्यवंशी, उषाबाई कोळी, उज्वला कोळी ललिता कावडे, शितल आहिरे, सुनीता साळुंके, ज्योती गवळी, सपना सोनवणे आदी शिवसैनिक, महिला कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/776640969801959/

Protected Content