Home Uncategorized कोरोनामुळे धार्मिक सणांना परवानगी नाही,गणेशोत्सवातही मर्यादा पाळाव्या लागतील : जयंत पाटील

कोरोनामुळे धार्मिक सणांना परवानगी नाही,गणेशोत्सवातही मर्यादा पाळाव्या लागतील : जयंत पाटील

0
46


मुंबई (वृत्तसंस्था) धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे. कोरोनामुळे धार्मिक सणांना परवानगी नाही. गणेशोत्सवातही मर्यादा पाळाव्या लागतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

 

जयंत पाटील पुढे म्हणाले. कोरोनामुळे लोकांना लक्षात आले की, देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधले. राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध नाही. पण कोरोनाच्या संकटात कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने कोरोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound