मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोना पॉझिटिव्ह

भोपाळ, वृत्तसेवा । कोरोनाचा संसर्ग मध्यप्रदेशात वाढत असतांना राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देखील कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना, छोटीशी चूकदेखील कोरोनाला आमंत्रण देऊ शकते, असं सांगत काळजी घेण्याचं आवाहन केलंय.

शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियावरून आपणं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिलंय ‘प्रिय देशवासियांनो, मला कोविड १९ ची काही लक्षणं जाणवत होती. त्यामुळे करण्यात आलेल्या टेस्टनंतर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी आणि माझ्या निकटचा संपर्क असणाऱ्या लोकांनी स्वत:ला क्वारंटीन करावं’.

Protected Content