अशी आहे…जळगाव जिल्हा कारागृहातून फरार झालेल्या कैद्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कारागृहात तीन कैद्यांनी पिस्तूल दाखवून मित्राच्या एकाच दुचाकीवर बसून फरार झाले. तिघे कैदी दुचाकीने पळ काढत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. कैद्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. जाणून घ्या फरार झालेल्या तिघा कैद्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी..!

जिल्हा कारागृहात सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील रा.शिरूड नाका, तांबापूरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड अमळनेर) यांनी सुरक्षारक्षक ऑनड्यूटी असतांना तिघांनी मारहाण केली आणि पिस्तूलाचा धाक दाखवत मुख्यप्रवेशद्वारातून पळ काढला.

फरार झालेल्या कैद्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
1. आरोपी कैदी सुशील मगरे हा १२ सप्टेंबर २०१७ रोजी जळगाव तालुक्यातील म्हसावद पोलीस दुरक्षेत्रात ड्यूटीवर असतांना गुन्हेगारीची टोळी तयार करून नेरी-औरंगाबाद रस्त्यावरील माळपिंप्रीजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या चालकाला बंदुकीचा धाक दाखवून लूट केली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित म्हणून सुशील मगरे याला १९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर दुसऱ्या गुन्ह्यात रिव्हाल्वरचा धाक दाखवून पुणे शहरातील कोथरुडमधील पेठे ज्वेलर्समधून 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना 24 नोव्हेंबर रोजी भरदिवसा घडली होती. यावेळी एकाने गोळीबारही केला होता.

2. पारोळा तालुक्यातील‍ पिंपळकोठा येथे पिलुकदेव महाराज यात्रेदरम्यान पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात आरोपी कैदी सागर संजय पाटील रा. अमळनेर व गौरव विजय पाटील रा.शिरूड नाका, तांबापूरा, अमळनेर) व इतर सोबत तीन आरोपींनी भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाच्या पोटात गावठी कट्ट्याने गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. यानंतर आरोपी चोरीच्या दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी कैदी सागर संजय पाटील याला पारोळा पोलीसांनी कन्नड जि. औरंगाबाद येथून अटक केली होती.

Protected Content