पुण्यात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या !

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील धायरी येथे एका बावीस वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोमल महादेव बादल असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

कोमलने बारावीनंतर नोकरी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, लॉकडाऊन पूर्वीच तिला नौकरी गमवावी लागली होती. कोमलने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरु नये, असे लिहून ठेवले आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट नाही. पीडित कोमलच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सिंहगड पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Protected Content