CRIME : लोहारखेडा येथे एकाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून ४१ वर्षीय व्यक्तीला तीन जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील लोहारखेडा येथे घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश राजाराम पाटील (वय-४१) रा. लोहारखेडा ता.मु क्ताईनगर जि. जळगाव हे स्वयंपाकीचे काम करून उदरनिर्वाह करतात. १९ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास लोहारखेडा गावातील शिव मंदिराजवळ संशयित आरोपी हरी पांडुरंग कोळी यांनी मागील भांडणाच्या कारणावरून हातातील विटाने मारहाण केली. तर सोबत असलेले योगेश पांडुरंग कोळी व वैभव योगेश कोळी सर्व रा. लोहारखेडा यांनीदेखील हातातील आसारी घेऊन पायांवर मारहाण केली. या मारहाणीत गणेश पाटील हे गंभीर जखमी झाले. उपचारानंतर शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी हरी पांडुरंग कोळी, योगेश पांडुरंग कोळी, वैभव योगेश कोळी सर्व रा. लोहारखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक उमेश महाजन करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content