शेंदूर्णी प्रतिनिधी। येथील शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑफ सोसायटीचे संस्थापक व विधानसभा माजी उपसभापती कै.आचार्य बापूसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड यांच्या ३६ व्या पुण्यतिथी निमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय निबंध स्पर्धा व रक्तदान शिबिर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाईन निबंध स्पर्धेत शिक्षक गटातून प्रथम क्रमांक सूरेखा सतीश भामरे, विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक तन्वी एकनाथ आग्रे यांना मिळाला. बापूसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं, त्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात १०१ रक्त पिशवीचे संकलन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप, तसेच दिनदर्शिका लोकार्पण अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, संस्थेचे सचिव सतीश काशीद, संस्थेच्या महिला संचालिका उज्वला काशीद, ज्येष्ठ संचालक सागरमल जैन, यु. यु. पाटील, संस्थेचे सहसचिव दीपक गरुड, वस्तीगृह सचिव कैलास देशमुख, पंचायत समिती सदस्य डॉ. किरण सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सदस्य शांताराम गुजर, सुधाकर बारी, धीरज जैन, शेरू भाई काझी, रवींद्र गुजर, स्नेहदीप गरुड त्याचप्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. उदार, उपमुख्याध्यापक एस. सी. चौधरी, पर्यवेक्षक आर.एस. परदेशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक पी. जी. पाटील यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक ए. सी. चौधरी यांनी मानले.