खोट्या गुन्ह्यांचे राजकारण गिरीश महाजन यांनीच महाराष्ट्राला शिकवले ( व्ही डी ओ )

 

 

जामनेर : प्रतिनिधी । खोट्या गुन्ह्यांचे राजकारण गिरीश महाजन यांनीच महाराष्ट्राला शिकवले असा आरोप करीत आज जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रपरिषदेत खळबळजनक दावे केले . आपण शांत बसणार नाही , यथावकाश पुराव्यांसह भंडाफोड करूच असा इशाराही त्यांनी यावेळी दिला .

वर्चस्व आणि दहशतीसाठी गिरीश महाजन यांनी राजकीय सत्तेचा दुरुपयोग केला . हे करताना त्यांनी जे जुमानत नाहीत त्यांना आणि राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी खूप छळ केला . खोटे गुन्हे दाखल करून त्रास देणे हा त्यांच्या डावपेचांचा भाग असायचा असे सांगत पारस ललवाणी पुढे म्हणाले कि , मी सुद्धा माजी नगराध्यक्ष आहे . माझ्या कार्यकाळात जामनेरात असा त्रास झाल्याचे लोकांनी एक तरी उदाहरण द्यावे . गिरीश महाजन यांना मला संपवून जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी हे संस्था ताब्यात घ्यायची होती त्यासाठी या संस्थेच्या प्रत्येक संचालकालाही त्यांनी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा अतोनात प्रयत्न केले पण आम्ही त्यांना पुरून उरलो . यापुढे तर त्यांचा मुकाबला करताना मी मरण पत्करायला तयार आहे . जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या ५०० कोटींच्या मालमत्तेवर त्यांचा प्रारंभापासून डोळा आहे ही मालमत्ता बालकावण्यासाठीच त्यांना या संस्थेवर वर्चस्व पाहिजे आहे आम्ही ही संस्था ताब्यात घेतल्यापासून ४०० कोटींची संस्थेची मालमत्ता विकसित केली त्यांनी जळगावच्या काही शैक्षणिक संस्था अशाच ताब्यात घेऊन काय केले हे सांगावे . पहुरची लेले शिक्षण संस्था ताब्यात घेऊन २ ० वर्षात त्यांना साधी संरक्षक भिंत किंवा ४ खोल्या बांधता आल्या नाहीत . मध्यंतरीच्या काळात तर ते मंत्री होते . शैक्षणिक विकासात त्यांनी काय काम केले ? , असेही ते म्हणाले .

गिरीश महाजन याना जामनेरचा शेतकी संघ ताब्यात घ्यायचा होता म्हणून शेतकी संघाचे जे संचालक ऐकत नाहीत त्या संचालकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास दिला . शेतकी संघ आणि जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संचालक आणि व्यापाऱ्यांच्या घरांसह दुकानांवर बुलडोझर चालवण्याच्या धमक्या दिल्या त्यामुळे माझी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , पालकमंत्री आणि एकनाथराव खडसे यांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी आमच्या तक्रारी काळजीपूर्वक आणि गांभीर्याने पाहून दखल घ्यावी , असेही ते म्हणाले

नगरपरिषदेच्या कारभारातही त्यांनी मनमानी केली आहे सगळे लेखापरीक्षण अहवाल पहिले तर लक्षात येईल कि वसूलपात्र रकमेची बेरीज ४० ते ५० कोटी रुपयांपर्यंत जाते आतापर्यंत गिरीश महाजनांनी जामनेर शहर आणि तालुक्यातील घोटाळ्यांतून किमान २०० कोटी रुपये हडप केले असू शकतात त्यांनी २ महिन्यापूर्वीच पळसखेडा शिवारातील १० कोटी रुपये किमतीची जमीन अवघ्या ४२ लाखात कशी खरेदी केली हे त्यांना विचारायला पाहिजे . विरोधकांना त्रास देऊन भाजपचे काम करायला भाग पाडायचे धंदे करीत त्यांनी जनतेपुढे नेतृत्वाचा आभास तयार केला आहे बाकी काही नाही . असेही ते म्हणाले .

जामनेरात तर त्यांनी १०—१० वर्षांपूर्वीच्या घटनांचा संदर्भ देत खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडलेले आहे आता ते कोणत्या तोंडाने सांगत आहेत कि त्यांच्याविरोधात गुन्ह्याला ३ वर्षांपूर्वीचा संदर्भ आहे ? या सगळ्या कारस्थानांमध्ये त्यांना त्या काळात जामनेरातील नजीर शेख नावाच्या पोलीस निरीक्षकाचीही साथ होती त्या पोलीस निरीक्षकाने मलाही त्रास दिला होता . एक व्यापाऱ्याच्या पत्नीला असेच खोट्या गुन्ह्यात अटक झाली तेंव्हा महावीर जयंतीच्या दिवशी जैन समुदायाच्या ५०० महिला रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात का थाम्बल्या होत्या ? या प्रश्नाचे उत्तर महाजन यांनी द्यावे असेही ते म्हणाले .

त्यांचे ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलची मोठ्या उदयॊजकांच्या देणग्यांवर उभे राहिले आहे मंत्रिपदाच्या काळात त्यांना या देणग्या मिळालेल्या असल्या तरी त्यातही अनेक बेकायदा बाबी आहेत . एका प्राध्यापकाच्या पत्नीने त्यांना न जुमानता राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरपरिषदेची निवडणूक लढवली म्हणून या कुटुंबालाही महाजन यांनी प्रचंड छळले अखेरीस ते कुटुंब जामनेर सोडून जळगावात स्थायिक झालेले आहे . असे सांगत पारस ललवाणी पुढे म्हणाले की माझ्यावर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेला हाताशी धरून गुन्हा दाखल केला तेंव्हा तेथील पोलीस निरीक्षकसुद्धा गिरीश महाजन यांच्या नादी लागू नका असे धमकावत होता . तुमच्या संस्थेचा वाद निपटून टाका गुन्हे मागे घेतले जातील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांमध्ये गिरीश महाजन यांची दहशत आहे असे तो सांगत होता , असेही ते म्हणाले .

https://www.facebook.com/508992935887325/videos/206089164465056

 

Protected Content