जळगावात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामानंदनगर रस्त्यावरील एका घरानजीकच्या पाण्याच्या टाकीत रात्री विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत वृत्त असे की, रामानंदनगर रस्त्यावरील चर्च परिसरातील घराच्या पाठीमागे अंडरग्राउंड असलेल्या पाण्याच्या टाकीत ला.ना. विद्यालयात शिकणार्‍या दहावीच्या विद्यार्थ्याचा शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. मयूर विजय सोनगिरे (वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास मयूर पाण्याच्या टाकीत पडलेला त्याची आई शीतल सोनगिरे यांना आढळून आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर घरमालक व शेजारी जमा झाले. त्यांनी मयूरला पाण्याच्या टाकीतून काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घराच्या पाठीमागे अंडरग्राउंड पाण्याची टाकी आहे. या टाकीत तो कसा पडला? याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.

Protected Content