आगामी निवडणुकीतही नाथाभाऊंचा विजयाचा आशावाद (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | “जिल्हा बँकेत विजय प्राप्त होईल हा विश्वास होताच. या यशाबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये वाढलेल्या विश्वासासह यापुढील निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी करायला हवी. यश आपलेच आहे” हा विजयाचा आशावाद माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची जिल्हा राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त केला

शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवड झालेल्या नवनियुक्त संचालकपदी निवड झालेल्या सदस्यांचा शनिवार दि.२७ नोव्हेंबर रोजी दुपारी राष्ट्रवादीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी आपल्या भाषणात खडसे म्हणाले की, “जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचं हे पन्नासावं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. आपण भाग्यवान आहोत की या पन्नास वर्षात आपली सत्ता आली” असं म्हणत त्यानी विश्वास व्यक्त केला. “भाजपकडे आमदार, खासदार असतांना आपण निवडून येऊ हा विश्वास नसल्याने त्यानी पळ काढला” असे ते म्हणाले.

उमेदवारांवर असलेल्या विश्वासाने जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकली ही असून यशाची परंपरा ही सुरूच राहणार असल्याचे त्यानी सांगितले पुढे ते म्हणाले, “ज्या वेळेस निवडणूकीत यश मिळते त्या वेळेस पक्षाचा प्रभाव काय आहे हे जाणवतं. कार्यकर्त्यांमध्ये विश्वास वाढतो. महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकसाठी आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी आत्ताच मोर्चेबांधणी करायला हवी” असं म्हणत पुढील काळात आपण यशाचं एक नवीन परिमाण निर्माण करणार आहोत. हा आशावाद त्यानी व्यक्त केला.

फेसबुक व्हिडिओ लिंक

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/261893282645911

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/577789966847121

Protected Content