Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात एक बाधित रूग्ण आढळला

कोरोना : जिल्ह्यात एक बाधित रूग्ण आढळला

0
109


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयात पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात १ बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राकन्वये कळविले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात अमळनेर तालुक्यातून एक बाधित रूग्ण आढळला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८१५ रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २२७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ९ ॲक्टीव रूग्ण उपचार घेत आहे. तर एकुण २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राकन्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound