एस.टी. चे विलीनीकरण अशक्य : उपमुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

मुंबई प्रतिनिधी | एस. टी. कर्मचार्‍यांना राज्य सरकारने समाधानकारक वाढ दिलेली असून दहा तारखेच्या आत पगार मिळण्याची हमी आम्ही घेतली आहे. मात्र त्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण अशक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात केले. यामुळे या मुद्यावरून राज्य सरकार ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

एस.टी. कर्मचार्‍यांना राज्य सरकारने वेतनवाढ दिली असली तरी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. राज्यतील बर्‍याच आगारांमध्ये मर्यादीत प्रमाणात वाहतूक सुरू झाली असली तरी बहुतांश वाहतूक अद्यापही बंद आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाष्य केले. ते म्हणाले की, एस.टी. कर्मचार्‍यांनी आम्ही समाधानकारक वाढ दिलेली आहे. मात्र विलीनीकरण अशक्य आहे. कधी तरी विलीनीकरण होईल असे कुणाच्या डोक्यात असेल तर ते काढून टाका असे उपमुख्यमंत्र्यांनी सुनावले.

अजितदादा पुढे म्हणाले की, राज्य सरकारने समाधानकारक वेतनवाढ केलेली असून आम्ही आता वेतनाची हमी देखील घेत असल्यामुळे एस.टी. कर्मचार्‍यांनी आपला संप मागे घेऊन ड्युटीवर यावे असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याप्रसंगी केले.

Protected Content