बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे बिबट्याने गायीचा फडशा पडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर पशूपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून गावात दहशत पसरली आहे. गावशिवारात नेहमी दिसणारी माकडे सुध्दा बिबट्याच्या दहशतीने दिसेनाशी झाली आहेत. अशी माहिती एका ग्रामस्थाने दिली. तर गावातीलच कास्तकार शंकर दयाराम तांगडे यांनी गोठ्या बाहेर गाय ( किं. ५० हजार) दावणीला ९ नोव्हेंबर २२ रोजी सायंकाळी बांधली होती. तर काल १० नोव्हेंबर रोजी सकाळी ते शेतात गेले असता गाय मृतावस्थेत आढळून आली. हिंस्त्र प्राण्याने गायीचा फडशा पाडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. त्यामुळे शंकर तांगडे यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता बिबट्याच्या पंज्याचे ठसे त्यांना दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी त्वरीत वनविभागाला कळविली असता वनविभागात कार्यरत कांडेलकर व सुधाकर पवार हे घटनास्थळी पोहोचले होते व ठस्यांचे छायाचित्र घेवून पंचनामा केला होता. बिबट्याने केलेल्या शिकारीमुळे गावकरी व जनावरांमध्ये सुध्दा दहशत पसरली आहे. वनविभागाने बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त न लावल्यास एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.

 

Protected Content