काँग्रेस आणि अकाली दलाचे कार्यकर्ते भिडले; एकाचा मृत्यू

 

अमृतसर वृत्तसंस्था । पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच काँग्रेस व अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा जाला असून यात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला पालीका निवडणुकांसाठी मतदान होणार असून, मतदानापूर्वी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान, पंजाबमधील मोगा येथे अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून, यावेळी झालेल्या हाणामारीत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक अन्य कार्यकर्ता गंभीररीत्या जखमी झाला आहे.

काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी मोगामधील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये झाली आहे. तिथे अकाली दलाचे कार्यकर्ते प्रचार करत होते. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर वाहन चढवल्याचा आरोप होत आहे. या घटनेत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर अन्य एक कार्यकर्ता जखमी झाला.

Protected Content