राज्यातील सत्तासंघर्षाबाबत उद्यापासून घटनापिठासमोर सुनावणी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेवर नेमकी मालकी कुणाची ? या संदर्भात दाखल सर्व याचिकांवर उद्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे.

महाराष्ट्रात शिवसेना पक्षामध्ये फुट पडून सत्तांतर झाल्यानंतर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांमधील लढाई सुप्रीम कोर्टात पोहचली आहे. या संदर्भात घटनापिठाची स्थापना करण्यात आली असली तरी याची सुनावणी नेमकी केव्हा होणार ? याबाबत माहिती मिळाली नव्हती. आज याबाबतची माहिती समोर आली असून या प्रकरणी उद्या म्हणजे १४ फेब्रुवारीपासून घटनापिठापुढे सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय घटनापिठापुढे ही सुनावणी होणार आहे. घटनापिठात न्याय. शहा,न्याय. मुरारी,न्याय. हिमा कोहली आणि नाय. नार्सिंमा यांचा समावेश आहे. उद्या सुप्रीम कोर्टाच्या सुचीमध्ये सकाळी १०.३० वाजता ५०१ क्रमांक देण्यात आलेला आहे.

एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील या कायदेशीर लढाईत नेमके काय होते याकडे महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षप्रकरणी घटनापीठाने ८ मुद्दे निश्चित केले आहे. यातील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती. त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता होती. पण आता हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे गेलं आहे. या घटनापिठाच्या समोरच आता उद्यापासून नियमीत सुनावणी होणार आहे.

Protected Content