Home Cities एरंडोल संतापजनक : लग्न करण्याचे अमिष दाखवत तरूणीवर अत्याचार !

संतापजनक : लग्न करण्याचे अमिष दाखवत तरूणीवर अत्याचार !

0
41


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्न करण्याचे आमिष दाखवत २८ वर्षीय तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील एका गावात राहणारी २८ वर्षीय तरूणी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. गावातील विक्की उर्फ मनोहर बापुराव पाटील (वय-२८) याने तरूणीला माझे तुझ्यावर प्रेम असून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. असे सांगून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तिने संबंध ठेवण्यास मनाई केली. याचा राग येवून त्याने तरूणीला शिवीगाळ व मारहाण करत तिचा हात पकडून पुन्हा त्याच्या घरी नेवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर पिडीतेला तिच्या आईवडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडीत तरूणीने कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मनोहर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि निता कायटे करीत आहे.


Protected Content

Play sound