कब्रस्तानातील समस्या संदर्भात नागरिकांचे आयुक्तांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुस्लिम कब्रस्तानातील कचरायुक्त माती महापालिकेने जेसीबीद्वारे ट्रॅक्टर ने कब्रस्तानचे बाहेर काढून देवून मागील वॉल कंपाऊंड बांधून देण्यात यावी अशी मागणी हजरत बिलाल रजि. बहुउद्देशीय सोसायटीतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, शिवाजीनगर मुस्लिम कब्रस्तानाच्या जागी १९४० पासून कचरा डेपो होता. त्यानंतर १९८० मध्ये कचरा डेपो बंद झाले, तसेच १९८८ मध्ये ठराव क्रमांक १८८ विकास योजने मार्फत मुस्लिम कब्रस्तानला जागा आरक्षित जागा देण्यात आली. सी.स.न. २७२२ गट नंबर ५०८ ब मुस्लिम कब्रस्तानसाठी मनपाकडून जागा मिळाली. आता त्या ठिकाणी मयत दफन करतांना कचरा, प्लास्टिक पिशव्या, कागद आदी कचरा निघत असतो. तरी मनपाने कचरायुक्त माती जेसीबी द्वारे काढून कब्रस्तानच्या बाहेर फेकावी, तसेच जवळील सर्व स्मशानभूमी जोगी दफन भूमी, लिंगायत दफन भूमी, या सर्वानाही चारही वॉल कंपाऊंड आहे. फक्त मुस्लिम कब्रस्तानात मागील बाजूस वाल कंपाऊंड नाही. त्यामुळे नाल्याचे घाण पाणी कब्रस्तानात येते व त्या खराब पाण्यामुळे मयताची विटंबना होईल. वॉल कंपाऊंड नसल्याने व नाला बाजूला असल्यामुळे आम्ही आणलेले चांगली माती पावसामुळे वाहून जाईल. तरी लवकरात लवकर वॉल कंपाऊंड बांधून द्यावी व कचरा युक्त माती जेसीबीने काढून द्यावी व त्याजागी लागणारी चांगली मातीची आम्ही स्वखर्चाने व्यवस्था करू अशी ग्वाही देण्यात आली आहे. निवेदन देतांना व्यवस्थापक शिवाजीनगर मुस्लिम कब्रस्तान व शिवाजीनगर रहिवासी, हजरत बिलाल रजि. बहुउद्देशीय सोसायटी अध्यक्ष सै. अकिल सै. अब्दुल्ला, जहांगीर खान, फिरोज पठाण, हुसेन हसन खान, शकील अहेमद आदी उपस्थित होते.

Protected Content