पोलनपेठेत तंबाखूजन्‍य पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई;

शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलन पेठ भागातील जयकारा ट्रेंडर्स येथे तंबाखू व सिगारेट विक्री करणाऱ्या तरूणावर कारवाई करत तंबाखू व सिंगारेटचा ९ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पोलनपेठ भागातील जयकारा ट्रेडर्स येथे पान मसाला आणि तंबाखूची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ सुनिल बडगुजर, पो.ना. गजानन बडगुजर, रतनहरी गिते, योगेश पाटील यांनी गुरूवार २३ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली.

यात अमित धनशामदास वासवाणी (वय-३०) रा. सिंधी कॉलनी, बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) यांच्याकडून ९ हजार ५०० रूपये किंमतीचा तंबाखू आणि सिगारेट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अमित धनशामदास वासवाणी (वय-३०) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!