जळगाव प्रतिनिधी । शिरसोलीकडे भरधाव वेगाने जाणारी कार दुचाकीला ओव्हरटेक करत असतांना समोरून अचानक कार आल्याने अपघात झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल आदीनाथ जवळ घडली. कारने जवळपास तीन ते चार कोलांट्या घेतल्या. यात एकजण जखमी झाला असून शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जळगावहून शिरसोलीकडे जात असतांना रोडवरील कृष्णा लॉन आणि हॉटेल आदीनाथ दरम्यान असलेल्या नाक्याच्या वळणावर दुपारी १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक (एमएच १९ सीसी १११९) पुढे जात असलेल्या दुचाकीला ओव्हर टेक करत असतांना अचानक समोरून कार आली. यात चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीला वाचवित असतांना कार थेट नांगरटी केलेल्या शेतात घातली. कारमध्ये तीन-चार जण बसलेले होते. ही कार एवढ्या वेगात होती की, तीन चार पलटी होवून शेतात गेली होती. त्यापैकी एक जण जखमी झाला आहे. दरम्यान कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. क्रेनच्या मदतीने कार शेतातून बाहेर काढण्यात आली आहे.