जळगावात डिलीव्हरी बॉयला मारहाण

जळगाव प्रतिनिधी | दुचाकीचे पाणी उडाल्याच्या कारणावरून शहरातील का.ऊ. कोल्हे विद्यालयाजवळ एका फुड डिलीव्हरी करणार्‍या तरूणाला अज्ञात तरूणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, सतीश काशिनाथ म्हस्के (रा. आहुजा नगर, जळगाव) हा तरूण एका ऑनलाईन फुड डिलीव्हरी करणार्‍या कंपनीत काम करतो. रात्री साडेनऊच्या सुमारास तो डिलव्हरी देऊन दुचाकीवरून येत असतांना काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ त्याला काही तरूणांनी मारहाण केली. कोणताही वाद नसतांना त्यांनी पाणी उडाल्याच्या कारणावरून सतीशला मारहाण करून ते पळून गेले.

दरम्यान, जखमी झालेल्या सतीश म्हस्के यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तोवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content