जि. प. अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील यांच्या हस्ते ‘पोषण माह’ चे उद्घाटन

जळगाव, प्रतिनिधी ।  जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील यांच्या हस्ते  ‘पोषण माह’चे  उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी, महिला बालकल्याण समिती सभापती ज्योती राकेश पाटील,  मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, महिला बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. राऊत उपस्थित होते. 

 

० ते ६  वर्ष वयोगटातील बालकांमधील बूटकेपणाचे प्रमाण कमी करणे, बालके, गर्भवती महिलास्तनदा माता यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्याकामी ‘पोषण माह अभियान’ २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे.

पोषण आहर कार्डचे वाटप

आज ‘पोषण माह’ च्या उद्घाटननंतर लाभार्थ्यांना प्रथमच ‘पोषण आहार कार्ड’चे वाटप अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्डचा उपयोग ज्या गर्भवती स्तनदा माता, बालके हे त्यांच्या गावातून स्थलांतर  केल्यास त्यांना स्थलांतरीत ठिकाणी हे कार्ड दाखविल्यानंतर  त्यांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र  राज्यातील अशा प्रकरचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जात आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, ‘पोषण माह’चा उद्घाटनप्रसंगी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Protected Content