एरंडोल प्रतिनिधी । येथील माध्यमिक विद्यालयातर्फे आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक स्वप्निल सोनवणे यांनी भावी वाटचालीबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात.
विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी प्रश्नोत्तरच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा, भावी आयुष्यात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. माजी उपनगराध्यक्ष शालिक गायकवाड यांनी संस्था व शिक्षक यांनी विद्यार्थाना घडवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतूक केले. निवृत्त नायब तहसिलदार विलास मोरे यांनी कवितेच्या माध्यमातुन यशस्वी जीवनाची सूत्रे सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन विसपुते यांनी विद्यार्थ्यानी मोबाइल व टीव्ही यांच्या आभासी विळख्यात अडकू नका असे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण यांनी परिक्षेबाबत माहिती दिली, विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. अनेक विद्यार्थी भाऊक झाले होते. कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक तुषार देवरे, अॅड. अजिंक्य काळे सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.