कासोदा येथील मुल्लाजी ग्रुपतर्फे धान्य व किराणा मालाचे वाटप

कासोदा प्रतिनिधी । कोरोना विषाणूसारख्या संसर्गजन्य रोगामुळे ३१ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे गावोगावी सतरंजी विकणाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. अशांना येथील मुल्लाजी गृपतर्फे धान्य व किरणा मालाचे वाटप करण्यात आले.

शहरातील अनेक छोटे मोठ सतरंजी विक्री करणारे हातमजूरांना लॉकडाऊनमुळे बाहेरगावी विक्री करण्यासाठी जाता येत नसल्याने दोन वेळच्या उपामारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितींना तोंड देण्यासाठी शहरातील मुल्लाजी ग्रुपतर्फे धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे गरजू लोकांचे फोटो न काढता वाटप करण्यात आले. यावेळी शाहिद मुल्लाजी, जुनेद मुल्लाजी, अखलाक मुल्लाजी, आफरीद मुल्लाजी, बासिद शेख रिजवान, अजहर मुल्लाजी, इकबाल शेख, अतिक मुल्लाजी, आवेश शेख, अर्तजा मुल्लाजी यांनी परिश्रम घेतले.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content