जागृत देवस्थान शिरसाळा येथे चौपदरीकरणाची मागणी

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  बोदवड तालुक्यातील जागृत देवस्थान शिरसाळा मारोती मंदिरावर जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे अशी मागणी भाविकांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुती मंदिर जागृत देवस्थान असून त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी असते. हिंगणे फाट्यावरून अवघे चार किलोमीटर अंतरावर शिरसाळा मारुती मंदिर असून त्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वळणाचा रस्ता असल्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असतात.वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्यामुळे वाहतूक ठप्प होते.परिणामी लाखो भाविकांना जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते.

दर शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे गावांमध्ये जाण्या येण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात तारेवरची तसंच करावी लागते. त्यामुळे हा रस्ता चौपदरीकरण व्हावा यासाठी अनेक वेळा गावकऱ्यांनी संबंधित विभागाला लेखी अर्ज वगैरे देखील केलेले आहेत. परंतु अद्याप पर्यंत संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्वरित चौपदरीकरण करण्याची कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

 

Protected Content