पुणे एमआयटी कॉलेजच्या जीएसपदी हिमांशु चौधरीची निवड

himanshu chaudhari

 

चाळीसगाव प्रतिनिधी । पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) विद्यापीठाचा जीएसपदी चाळीसगाव शहरातील प्रसिध्द उद्योजक शुभ डेव्लपर्सचे संचालक तथा तालुका तेली समाजाचे उपाध्यक्ष भरत चौधरी यांचे लहान चिरंजीव हिमांशु चौधरी यांची प्रचंड मतांनी निवड झाली आहे.

शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्यगुण व बुध्दीचातुर्याच्या सर्वसमावेशक गुणांच्या आधारावर हिंमाशूची निवड करण्यात आली आहे. डब्ल्यू.पी.यु एमआयटी विद्यापीठ पुणे येथे जवळपास ३३ हजार विद्यार्थी विविध प्रकारच्या ७५ अभ्यासक्रमांचे ज्ञानार्जन येथे करतात. या सर्व विद्यार्थ्यांमधून हिमांशुची मतदान पध्दतीने निवड झाली आहे. हिमांशुच्या निवडीने चाळीसगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरी सारख्या सारस्वत शहरामध्ये हिमांशुने आपल्या नावाचा विजयी डंका रोवला आहे. यापूर्वी देखील हिमांशुसह त्याचे मोठे बंधू हितेश चौधरी याने विद्द्यापीठात आयोजित युवा सांसद परिषद व अन्य उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. त्यांच्या यशामागे वडील भरत चौधरी, आई मीना चौधरी, भाऊ हितेश चौधरी यांचेसह विद्यापीठाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराची मोलाची साथ मिळाली आहे. त्यांचा या यशाबद्दल हिमांशुचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचा भविष्यासाठी मराठे परिवार व भाजप युवा मोर्चाच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Protected Content