मंत्रिमंडळाचा पेच अखेर सुटला…उद्या होणार शपथविधी

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राजभवनावर त्या अंनुषगाने तयारी देखील सुरू झाली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार आहे. १० ते १५ मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान हा शपथविधी राजभवन ऐवजी विधिमंडळात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यासोबतच कॅबिनेट विस्तार देखील होणार आहे. सूत्रांचे असे म्हणणे आहे की, मंत्रिमंडळाबाबत सर्व काही ठरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही तासांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे.

Protected Content