माझी वसुंधरा अभियानांतर्गत यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली जल शपथ

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व यावल नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धनासह जल शपथ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व यावल नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री मनोज म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी पाण्याचे महत्व भविष्यात सजीवांसह मानवाला किती महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षणासह पाण्याची बचत स्वतःपासून करावी याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वावरताना चुकून पर्यावरणास अनेक वेळा हानी पोहोचवत असतो. तेव्हा कशामुळे व कशाप्रकारे आपल्या हातून पर्यावरणास हानी पोहोचतो असे कृत्य करण्यास टाळण्याचे आवाहन माझी वसुंधरा अभियानाचे प्रमुख तुकाराम सांगळे यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार, डॉ झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य रहीम रझा, कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. मुकेश येवले, प्रा. मनोज पाटील, प्रा. ई. आर. सावकार, प्रा संजीव कदम आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना जल शपथ ही राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार यांनी दिली. विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. एच जी भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा , स्वच्छता निरीक्षक वीरेंद्र घारु, गणेश जाधव, सुभाष कामळी, एम. पी. मोरे, सि.टी. वसावे, सचिन बारी, यतीन पाटील, तेजस बडगुजर आदींनी सहकार्य केले.

Protected Content