नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेत ज्ञानेश चौधरी पात्र

WhatsApp Image 2019 10 04 at 4.35.26 PM

फैजपूर, प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल जळगाव येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तर, मनपास्तर शालेय मैदानी क्रीडास्पर्धेत ज्ञानेश सुनील चौधरी जिल्ह्यातून प्रथम स्थान पटकविले.

१४ वर्ष आतील खेळाडू अंतर्गत ४०० मी. धावणे या क्रीडाप्रकारात जे. टी. महाजन इंग्लिश मेडिअम स्कूलचा इ. ८ वी तील विद्यार्थी ज्ञानेश सुनील चौधरी हा जिल्ह्यातून प्रथम आला. त्याची नाशिक विभाग क्रीडास्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली. ज्ञानेश चौधरी याला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक विश्वजय राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव , पर्यवेक्षिका पुनम नेहेते, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ज्ञानेशचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

Protected Content