पाचोरा शहरात दिलीप वाघ यांची प्रचार रॅली

WhatsApp Image 2019 10 05 at 3.03.34 PM

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आपली उमेदवारी असून, त्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही देत भडगावातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांनी प्रचार प्रारंभ केला. शहरातील आझाद चौकातील श्रीराम मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर शहरातून रॅली कढत त्यांनी मतदारांचा आशीर्वाद घेतले.

माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांनी भडगाव तालुक्यात झंझावाती प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांना सर्व स्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. शहरातील श्रीराम मंदिरात त्यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले की, शहरासह संपूर्ण तालुक्‍याच्या विकासाचे लक्ष्य घेऊन आपण उमेदवारी करीत आहे. त्यासाठी मला आपल्या सर्वांची मला साथ हवी आहे. आपल्या आमदारकीच्या काळात झालेला विकास सर्वाना ज्ञात आहे. त्यामुळे आपली बांधीलकी ही विकासाची आहे. रखडलेली कामे मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. यावेळी पाचोरा गटनेते संजय वाघ, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष शामकांत भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय पवार, माजी नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख, नगरसेविका योजना पाटील, नगरसेवक सुभाष पाटील, भिकनुर पठाण, इसाक मलिक, अल्पसंख्य शहराध्यक्ष शेरखान पठाण, फ्रुट सेलचे शिवाजी पाटील माजी सभापती मोहन पाटील, अरुण पवार, अनुप बोरसे, अल्पसंख्यांक सेलचे डॉ. जे. डी.शेख, दीपक पाटील, दीपक काशीराम पाटील, माजी शहराध्यक्ष रवींद्र महाजन, तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, योगेश महाजन, रमेश शिरसाठ, सागर परदेशी, मोहसीन शेख, अनिल टेकडे, निमन शेख, विशाल पाटील, कुणाल पाटील, शिवदास पाटील, संजय पाटील, अरुण गंजे, सुनील पाटील, मोतीलाल नरवाडे, डी. डी. पाटील, कल्याणराव पाटील, अरुण पाटील, सुदाम वाघ,विनायक देशमुख, पुंडलिक कुंभार, गोविंद महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते. रॅली आझाद चौक, भडखंबा, देशमुखवाडा, शनिचौक, जागृती चौक, जमादार मोहल्ला, कोळी वाडा, जलीला मोहल्ला, काकासट चौक, धनगाई गल्ली, मेन रोड, सिनेमा गल्ली, खोल गल्ली, महादेव गल्ली, नगरदेवळा
दरवाजा, तहसील कार्यालयासमोर, बस स्टॅन्ड परिसर, बढे सर कॉम्प्लेक्स मार्गे राष्ट्रवादीच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

Protected Content