राज्यातील चित्र बदलतेय : शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील चित्र बदलत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काल धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अमरीश पटेल विजयी झाल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वारे होते. नंतर मात्र उर्वरित जागांवर भाजपला अपयश मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, अमरावती शिक्षक आणि नागपूर पदवीधर या चारही जागांपैकी तीन ठिकाणी महाविकास आघाडी तर एका ठिकाणी अपक्ष आघाडीवर आहे. तर मराठवाडा पदवीधरमधून आधीच सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. यामुळे या निवडणुकीत भाजपची जोरदार पीछेहाट झाली आहे.

या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की, धुळे-नंदुरबारचा निकाल अपेक्षितच होता. मात्र अन्य ठिकाणी महाविकास आघाडीला यश लाभले असून आता राज्यातील चित्र बदलू लागले आहे.

Protected Content