विवेकानंद प्रतिष्ठानातर्फे ‘शककर्ते शिवराय’ या चार दिवसीय महानाटयाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूण प्रयोगांसाठी ओळखले जाते. विद्यार्थांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिवर्षी ‘रंगतरंग’ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

यंदाचे वर्ष हे ‘हिंदवी स्वराज संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळयाचे ३५० वे वर्ष’ या संकल्पनेवर आधारित ‘शिवजन्मपूर्व महाराष्ट्र ते शिवराज्याभिषेक सोहळा’ हा नेत्रदीपक कार्यक्रम दि.९ ते १२ जानेवारी २०२४ या दरम्यान शहरातील बॅरीस्टर निकम चौक (सागर पार्क) म.न.पा. मैदान, जळगाव या ठिकाणी ‘शककर्ते शिवराय’ या चार दिवसीय महानाटयातून सादर होणार आहे.या कार्यक्रमाची सुरूवात किल्ला बनविणे, चित्रकला व मॉडेल (प्रतिकृती) प्रदर्शन आणि कार्यक्रमाचे उद्धाटनव्दारे करण्यात येईल. त्यानंतर डॉ. अविनाश आचार्य प्राथमिक विद्यालय आणि प्राथमिक शाळा, वाघनगर यांच्या वतीने शिवजन्मपूर्व ते रायरेश्वराची शपथ हे नाटय सादर करण्यात येईल.

१० जानेवारी रोजी ब.गो. शानभाग विद्यालय आणि श्रवण विकास मंदिर यांच्या वतीने व्यक्तीनिर्माण व स्वराज्य संकल्पनेची उभारणी हे नाटय सादर करण्यात येईल. ११ जानेवारी या दिवशी काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल यांच्या वतीने स्वराज्याची उभारणी-युध्दनीती, गनिमी कावा व यशस्वी मोहिम हे नाटय सादर करण्यात येतील. १२ जानेवारी या अंतिम दिवशी इंग्लिश मीडियम स्कूल व उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा, वाघनगर यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा या नाटय सादर केले जाईल आणि महानाटयाचे समारोप होईल.

Protected Content