राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जाणून घेतले आधुनिक शेती तंत्रज्ञान

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथे सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी विविध स्तरातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद  मिळत आहे. दुसऱ्या दिवशी परिसरातील शाळांमधील विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देऊन वेगवेगळ्या तंत्रज्ञाना बाबतीत जिज्ञासा जाणून घेतली.

सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुलच्या 288 विद्यार्थी, माध्यमिक आश्रम शाळा लोहारा येथील 40 विद्यार्थी, कुसुमताई मधुकरराव चौधरी विद्यालय फैजपूर येथील 324 विद्यार्थी, धनाजी नाना विद्यालय खिरोदा येथील 45 विद्यार्थी, चेतना इंग्लिश मीडियम स्कूल येथील 32 विद्यार्थी इत्यादी शाळेमधील मुलांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

रावेर-यावल तालुक्यातील शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सुद्धा  भेट देऊन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. यात ब्रिगेडियर पी .एन. चौधरी खिरोदा व प्रयोगशील शेतकरी अनिल लढे न्हावी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.  विद्यार्थ्यांना शेतीचे शेतीविषयक प्राथमिक ज्ञान  देण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ट्रॅक्टर स्टॉलवर जाऊन मिनी ट्रॅक्टर स्वतः चालवुन ट्रायल घेतली. काही शेतकऱ्यांनी महिला बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या काही वस्तू खरेदी केल्या.

काही लोकांनी प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारा जवळ व परिसरातील विविध ठिकाणी सेल्फी घेण्याचा आनंद घेतला सेल्फी घेण्याचा त्याचा मोह आवरता आला नाही. कृषी प्रदर्शन संस्थेचे मार्गदर्शक शिरीषदादा चौधरी, अध्यक्ष आत्माराम चौधरी, सचिव अजित पाटील, युवा सहकारी धनंजय चौधरी, प्रा.व्ही.आर.पाटील, जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मधुस्नेह संस्थेचे कृषी व ग्रामविकास विभागाचे समन्वयक विवेक ठाकरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश महाजन, डॉ.धीरज नेहते यांच्यासह मधुस्नेह संस्था परिवार परिश्रम घेत आहे.

Protected Content