फैजपूर शहरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अधिक माहिती अशी की, फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २६ मार्च रोजी रात्री घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचे घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. नातेवाईकांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देवीदास सुरदास करीत आहे.

Protected Content